देवळा : गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित कणकापुर- वडाळे सिंगल फेज योजनेचे काम पुर्ण झालेले असून , येत्या दोन दिवसात सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ.सौ.नुतन आहेर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर यांचा सत्कार करून आभार मानले.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर कामाची स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी मागणी होत होती राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले . त्यानंतर लगेच जिल्हा नियोजन समितीकडे तत्काळ प्रस्ताव सादर करण्याची सूचना महावितरण कंपनीस डॉ.नूतन आहेर यांनी दिली व सदर प्रस्तावास पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडुन मंजुरी करून महत्वकांक्षी योजना मार्गी लावण्याचे काम केले. कामाच्या पुढील प्रक्रिया जलद गतीने राबवून कामास प्रारंभ करुन काम आज पूर्ण झाले व येत्या दोन दिवसात सिंगलफेज वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कणकापुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिक शिंदे, श्रीराम शिंदे, सुभाष बर्वे, उत्तम शिंदे, आबा सावकार, कारभारी शिंदे, संजय शिंदे, केवळ शिंदे, योगेश शिंदे, समाधान शिंदे, दयाराम देवरे, कडू बच्छाव व कणकापुर, खर्डे, वडाळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम