द पॉईंट नाऊ ब्युरो ;बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सदैव काही ना काही गोष्टी मुळे चर्चेत असते. तिच्या अशाच एका भडकाऊ वक्तव्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कंगना राणावत (Kangana Raanavat) हिने, नुकतेच भारताला 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य (Freedom) हे भीक होते आणि खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे म्हटले.
कंगणाच्या या वक्तव्यामुळे, तिच्यावर सर्व क्षेत्रातून टीका झाली. याच तिच्या वक्तव्या मुळे तिच्यावर, पुण्या (Pune) मध्ये दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना राणावत ही मागील बऱ्याच कालावधी पासून, भाजप (BJP) प्रणित केंद्र सरकारचे किंबहुना भाजप चे समर्थन प्रत्येक ठिकाणी करतांना दिसत आहे.
भाजप 2014 साली सत्तेत आला. आणि याच हवाल्यावर, तिने भारताला खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाल्याचे म्हटले.
यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कंगणाचे 1947 बाबत वक्तव्य चुकीचे होते. मात्र भाजप बाबत, तिची भावना योग्यच होती, असे म्हटले होते.
त्यात नुकताच, कंगना राणावत ला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कारासाठी, (Padmashree Award) तिची निवड झाल्याने, सर्व स्तरातून मोठी टीका करण्यात आली.
कोरोना काळात सर्वांना मदत करणारा सोनू सूद (Sonu Sood) यास हा पुरस्कार देणे योग्य होते. असे सोशल मीडियावर सर्वांनी मत व्यक्त केले.
कंगणाने नुकतेच भारताला मिळालेले 1947 चे स्वातंत्र्य भीक असल्याचे म्हटल्याने, तिच्यावर देश द्रोहाचा गुन्हा, दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
कंगना राणावत ही भाजपच्या समर्थनार्थ, नेहमीच पुढे येतांना दिसते. त्यात दरम्यान च्या काळात, तिने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांबाबत देखील, एकेरी उल्लेख केला होता. तसेच तिने शिवसेनेला डिवचले देखील होते.
कंगणाच्या अतिक्रमण अंतर्गत येणारे कार्यालय आणि इतर बांधकाम पाडण्यात आल्याने, ती बिथरली होती. त्यानंतर, तिने थेट शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thakarey) निशाणा साधत, एकेरी उल्लेख करत टीका केली होती.
यामुळे कंगना राणावत हिला सुरक्षा (Security) प्रदान करण्यात आली होती. आता कंगना राणावत हिने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्या बाबत गैर वक्तव्य केल्याने, तिच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्या मधील चतुशृंगी आणि सिंहगड पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कंगणाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर अजून काही ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम