रोहित गुरव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (ताहाराबाद) : राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेऊ नयेत, या प्रकारचे निवेदन बागलाण येथे काँग्रेस पदाधिकारी वर्गाने तहसीलदारांना दिले आहे.
सध्या स्थानिक निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यात न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्याने सर्व राजकीय पक्ष, राजकीय मंडळींचा हिरमोड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकच न घेण्याची मागणी केली होती. तर ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक थांबवून इतर भागांची निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.
मात्र राजकीय मंडळींच्या चेहऱ्यावरील नूर यामुळे कमी झाला आहे. यासाठीच बागलाण येथे तहसीलदारांना निवडणूक न घेण्याबाबत निवेदन घेण्यात आले.
ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजावर हा अन्याय होत आहे. मनोमोहन सिंह सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून ओबीसींचा इंपिरियल डेटा तयार केला. मात्र भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी रोहिणी आयोगाला ओबीसींच्या मानेवर सुरा ठेवणारा डेटा दिला असा आरोप काँग्रेस ने केला आहे.
याबाबत निवेदन देत होत असलेल्या निवडणुका थांबवाव्यात अशी मागणी काँग्रेस ने केली आहे.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य पप्पू तात्या बच्छाव, जि. प. सदस्य रेखा पवार यांचे पती ग्रामपंचायत सदस्य यशवंत पवार, डॉ. नितीन पवार, निलेश कांकरिया आदींसह प्रमुख काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम