ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांची नाराजी; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

0
39

द पॉईंट नाऊ : दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना घ्याव्यात या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षांना विरोध करण्यासाठी पुणे, नागपूर आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची दाट शक्यता आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुणे, नागपुरसह अन्य काही शहरांत गर्दी करत ऑफलाईन परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे. वर्षभर ऑनलाईन शिकवल्यानंतर आता ऑफलाईन परीक्षा घेणे, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाईन होत्या. ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.

अकोल्यात तब्बल तीनशे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली आणि कार्यालय परिसरात एकच विद्यार्थी एकतेच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. ‘आमचे जरी लसीकरण झाले असले तरी आम्ही अजूनही मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने ऑफलाईन परीक्षा देण्यास तयार नाही. त्यामुळे परीक्षा न घेता या पुढे ढकलण्यात याव्यात आणि पुढील वर्षी ऑफलाईन शाळा सुरू करून नंतर परीक्षा घ्यावात’ अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here