द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा एड्स नियंत्रण विभाग नाशिक यांच्यातर्फे एच. आय. व्ही. व एड्स संदर्भात ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका मानसी जाधव व मिताली जाधव यांनी भाग घेतला.
या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, जिल्हा समन्वयक सुनिता बोरसे, जिल्हा पर्यवेक्षक नरेंद्र पाटील, योगिता खडांगळे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर यांनी केले. परीक्षक म्हणून समुपदेशक प्रविण देवरे यांनी काम पाहिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
very nice session
Nice