द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी 20 डिसेंबर पर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्या बाबत कोणताही निर्णय तूर्तास होणार नसल्याचे म्हटले आहे.
सध्या एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर आत्ता पर्यंत संप करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आत्ता पर्यंत भरपूर वेळा इशारा दिला. मात्र एस. टी. कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.
येत्या 20 डिसेंबर ला राज्य सरकारला उच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यामुळे 20 तारखेपर्यंत मेस्मा लावण्या बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
जवळपास दीड महिन्यापासून एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ज्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल संपता संपत नाही आहेत. या कारणास्तव आत्ता पर्यंत दहा हजाराहून अधिक एस. टी. कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर बऱ्याच जणांना सेवा मुक्त करण्यात आले आहे.
एवढे सगळे करूनही एस. टी. महामंडळ कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी अजून देखील हा संप सुरू आहे.
राज्य शासनाने पगार वाढ दिली. त्यानंतर कामावर परतण्याचे आवाहन बऱ्याच वेळा करण्यात आले. बरेच कर्मचारी कामावर परत देखील आले. मात्र एस. टी. बस रस्त्यावर धावू लागल्या नंतर दगड फेकीच्या अनेक घटना घडल्या.
राज्य शासनाने संप करणाऱ्या एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा इशारा दिला. मात्र आता 20 तारखे पर्यंत मेस्मा लावण्याबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
आता येत्या 20 तारखेला राज्य शासन न्यायालयात काय म्हणणे मांडते? काही निर्णय होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम