एस. टी. कर्मचाऱ्यांना लागणार मेस्मा? काय आहे ‘मेस्मा’?

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  एस. टी. कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही संप थांबत नसल्याने, आता राज्य सरकारने मेस्मा लावण्याबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

एस. टी. कर्मचारी संपावर जाऊन आता मोठा कालावधी उलटला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने एस. टी. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देखील दिली. मात्र तरी देखील एस. टी. कर्मचारी संप मिटवायला तयार नाहीत.

याच कारणास्तव आता राज्य सरकार मेसमा लावण्याची तयारी करत आहे.

काय आहे हा ‘मेस्मा? चला जाणून घेऊयात.

– शासन व्यवस्थेद्वारे नागरिकांसाठी सार्वजनिक सेवा सुरू असते. त्यात जर आंदोलन, मोर्चे याद्वारे आडकाठी करण्यात आली, तर राज्य शासनाला संबंधितांना ‘मेस्मा लावण्याचा अधिकार आहे. संबंधित आंदोलनाला रोखण्यासाठी राज्य सरकार मेसमा चा वापर करते.

– सर्वात आधी हा कायदा वापरण्याचा अधिकार केंद्र सरकार कडे होता. याचा वापर केंद्र सरकारने 1968 साली केला होता. त्यानंतर हा कायदा वापरण्याचा अधिकार राज्यांना देखील बहाल करण्यात आला.

– शासनाच्या अधीन असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सेवांमध्ये अडथळा आल्यास, नागरिकांची गैरसोय झाल्यास, अंतिम पर्याय म्हणून शासनाद्वारे मेस्माचा वापर केला जातो.

– हा कायदा अधिकाधिक सहा महिन्यांपर्यंत सरकार लावू शकते.

– मेस्मा लावल्यानंतर देखील जर संबंधित कर्मचारी आंदोलन सुरू ठेवत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार शासनाला असतो.

– संपकरी कर्मचाऱ्यांना अटक करणे, दंड करणे असे अधिकार राज्य शासनाला या कायद्या अंतर्गत असतात.

दरम्यान, राज्य शासनाने आता एस. टी. कर्मचाऱ्यांना अखेरचा इशारा दिला आहे. यानंतर देखील एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला, तर मेस्मा लागण्याची शक्यता मोठी आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. वारंवार सांगून देखील आंदोलन थांबवले जात नसल्याने, आत्तापर्यंत सुमारे 9 हजाराहून अधिक एस. टी. कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

वेळेवर न होणारे वेतन, मिळणाऱ्या वेतनात होणारी कपात अशा अनेक कारणांमुळे एस. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालू केले. त्यानंतर राज्य सरकारने वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र संपकरी कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

आता मेस्माचा इशारा दिल्यानंतर आंदोलक एस. टी. कर्मचारी काय निर्णय घेतात? की आंदोलन चालूच ठेवतात? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here