द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षानंतर यंदा कार्तिकी यात्रेचा सोहोळा उत्साहात पार पडला. मात्र या वर्षाच्या कार्तिकी यात्रेवर एसटी संपाचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे.
भाविकांची संख्या घटल्याने त्याचा थेट परिणाम विठुरायाच्या देणगीवर झाला आहे. 2019 च्या तुलनेत यंदाच्या कार्तिकी यात्रेत तब्बल 1 कोटीने उत्पन्न घेतलं.
याच वेळी एसटी संप चालू असल्याने त्याचा परिणाम कार्तिकी यात्रेवर झाला आहे. एसटी, बस बंद असल्याने वारकऱ्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे.
आणि या कोरोना मूळे आठ वाऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कार्तिकी यात्रेमध्ये भक्ती निवास असेल किंवा देणगी असेल हे सर्व मिळून 1 कोटींचा उत्पन्न या वर्षी जमा झाला आहे. असं सांगण्यात आलं आहे.
मागील कार्तिकी यात्रेमध्ये भक्तांची गर्दी जास्त होती. मात्र एसटी, बस संपामुळे यंदा मात्र गर्दी कमी असल्याचे दिसून आली आहे.
या संपूर्ण वादग्रस्त घटनेमुळे कार्तिकी यात्रेसोबतच शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना देखील चांगलाच फटका दिसून आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम