मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला असल्याचे एमपीएससीने जाहीर केलं आहे. 2020 साली होणारी संयुक्त पूर्व परीक्षा ही कोरोनाच्या परिस्थिती मुळे 6 वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकारने लवकरच परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले त्यानुसार ही घोषणा करण्यात आली. कोरोना कमी झाला आहे तर परीक्षा लवकर घ्या अशी मागणी विध्यार्थी करू लागले होते. या परीक्षेला जवळपास 4 लाख विध्यार्थी बसले असून .परीक्षा झाली नाही तर MPSC समन्वय समिती. येत्या 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी आंदोलन करणार होती महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला होणार असल्याच एमपीएस्सीने केलं जाहीर केले आहे.
विविध पदांसाठी भरती
सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO : 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI : 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI :650 जागा
एकूण -806
विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
विद्यार्थी परीक्षेची वाट बघून नैराश्यात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार राज्यात असंतोष निर्माण झाला होता. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने गदारोळ निर्माण झाला होता. एमपीएससीच्या या घोषणेने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम