द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या तीन वर्षातील सर्वात जास्त जागा यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढल्या आहेत. राज्यातील आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि विविध विभागांमधून १५५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच एमपीएससीकडून लवकरच विद्यार्थ्यांना एक वर्षांची संधी वाढवून देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सध्या ७१६८ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे गेल्या २ ते ३ वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत नव्हत्या त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी आंदोलन केले, रस्त्यावर येऊन नाराजी व्यक्त केली. आता त्या मुलांसाठी संधी आहे कि ते या जागांचा फायदा घेऊन सरकारी नोकरी मिळवू शकतात.
“गट-अ संवर्गातील ४४१७, गट-ब संवर्गातील ८०३१ आणि गट क संवर्गातील ३०६३, अशा एकूण १५५११ पदे एमपीएससीमार्फत भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यातील गट-अ २८२७ गट-ब २६४१ व गट-क १७००, अशी एकूण ७१६८ पदांचे विद्यानिकेतन अॅकॅडमीच्यावतीने मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आहे. अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम