द पॉईंट प्रतिनिधी : भारतीय सैन्यात जाण्यासाठी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेझ असते. अर्थात, देशभक्तीप्रति आणि एका उद्देशाने तरुण वर्ग सैन्यदलाकडे वळतो. त्यात एन. डी. ए. अर्थात, नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग प्रयत्न करतो. मात्र मोजक्याच तरुणांना त्यात संधी मिळते. आत्तापर्यंत एन. डी. ए. मध्ये केवळ मुलांना संधी होती. मात्र आता मुलींना देखील एन. डी. ए. मध्ये संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिलाय. नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आता मुलींना देखील पात्रता परीक्षेस बसता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात मुलींना नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये प्रवेशासाठी संधी मिळावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने निकाली काढत हा ऐतिहासिक निर्णय दिला. यामुळे मुलींचा देखील एन. डी. ए. मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात सध्या मुलींचा मोठ्या प्रमाणावर वरचष्मा आहे. १० वी असो किंवा १२ वी अशा प्रत्येक परीक्षेत नेहमीच मुलींचा वरचष्मा दिसून आला आहे. आणि आता एन. डी. ए. साठी देखील मुलींना संधी मिळणार असल्याने, एक मोठा बदल घडतांना आपल्याला दिसून येणार आहे.
भारतीय सैन्य दलात महिला वर्गाचा देखील समावेश आहे. त्यात नुकताच महिलांना सीमेवर तैनात करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. आणि आता एन. डी. ए. मध्ये प्रवेशाचा मार्ग मुलींसाठी मोकळा झाल्याने, मुलींसाठी अजून दारे खुली झाली आहेत.
एन. डी. ए. चा प्रवास अगदी पात्रता परिक्षेपासूनच खडतर असतो असे म्हटले तरी चालेल. त्यात हजारो मुले पात्रता परीक्षा देतात. आणि त्यात अतिशय मोजक्या मुलांना संपूर्ण भारत भरातून संधी मिळते. त्यानंतर मग पुढे एन. डी. ए. मध्ये खडतर प्रवास सुरु होतो आणि शेवटी सैन्य दलासाठी त्यातून अधिकारी वर्ग निर्माण होतो.
आता मुलींना देखील यात संधी मिळणार असल्याने, एन. डी. ए. साठी अजून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढणार हे मात्र नक्की. यामुळे आता आपल्याला एन. डी. ए. च्या खडतर प्रशिक्षणातून सैन्य दलात महिला अधिकारी वर्ग नियुक्त होतांना बघायला मिळतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम