द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. नालासोपारा येथे जवळपास पावणेदोन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत दोघांना अटक करत हे 5 कोटींहून अधिकचे हेरॉईन जप्त केले आहे. ठाणे आणि मुंबईच्या एटीएस पथकाने कारवाई करत हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमली पदार्थांचा हा साठा विकण्यासाठी राजस्थानमधून आलेल्या या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामुळे पोलिसांना मोठे सुयश लाभले आहे.
मुंबई शहरात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तस्करी होत असते. यासाठी पोलीस पथक नियमित लक्ष ठेवून असते. याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत हा मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम