‘एक सूचक बाकी वाचक’ हिरे महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

0
31

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आज “एक सूचक बाकी वाचक” या संस्थेच्या शाखेचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त व संस्थेच्या सांस्कृतिक, कला व जनसंपर्क विभागाच्या अध्यक्षा मा. संपदादीदी हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त व उपक्रमशील प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, अभिनेते व लेखक मा. चंद्रकांत राऊत, कलाकार फॅक्टरीचे अध्यक्ष पंकज सातव आदी उपस्थित होते.

“वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. एक पुस्तक माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे काम करू शकते. शब्द्संग्रहाबरोबर भाषा समृद्ध होते व शब्दांचे विविध प्रकारचे उपयोग समजतात. वैचारिक व भावनिक समृद्ध व्हायचे असेल तर दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजे” , असे मत महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त व संस्थेच्या सांस्कृतिक, कला व जनसंपर्क विभागाच्या अध्यक्षा मा. संपदादीदी हिरे यांनी व्यक्त केले.

अभिनेते व लेखक मा. चंद्रकांत राऊत यांनी एक सूचक बाकी वाचक या शाखेंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देतांनाच वाचनामुळे झालेले बदल विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी केले.

पंकज सातव यांनी अभिनेते व लेखक मा. चंद्रकांत राऊत यांचा परिचय करून दिला. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांनी एक सूचक बाकी वाचक या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश शेवाळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या जनसंपर्क विभागाचे नवनीत देवरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here