द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दोन जावांमध्ये सख्ख्या बहिणी सारखं नातं असणं ही बाब क्वचितच ऐकायला भेटते. तर बऱ्याच वेळा दोन जावांमधील वाद देखील समोर येत असतात. दोन जावा म्हटल्या म्हणजे दोन वेगवेगळ्या घरातील व्यक्ती तिसऱ्या घरी आलेल्या असतात.
पुण्यात असाच दोन जावांमधील वादाचा प्रकार समोर आलाय. ज्यात दोघींनी एकमेकींच्या पतींवर बलात्काराचा आरोप केलाय. यामुळे एकाच घरातील दोन व्यक्तींवर दाखल झालेल्या गुन्ह्यांनी पोलिसांसमोर देखील प्रश्न उभा राहिला आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. या दोघीही चुलत जावा असल्याचं सांगण्यात येत आहे.
एकमेकांच्या पतींवर बलात्काराचा आरोप केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. आपल्यावर शेतात गोठ्या मध्ये चुलत दिराने अन्य दोघांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
तर संबंधित चुलत दिराच्या पत्नीने तक्रारदार महिलेच्या पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत परस्परांवर तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. या महिलेने संबंधितावर आपल्याला लॉज वर नेण्यात येऊन, तसेच राहत्या घरी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे.
एकाच घरातील व्यक्तींनी परस्पर विरोधी आरोप करत थेट बलात्कार केल्याचा आरोप केल्याने एकाच घरातील हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
यामुळे हा प्रकार नेमका काय आहे? हे आरोप – प्रत्यारोप का करण्यात आलेत? यामागील सत्यता काय आहे? याचा पोलीस तपास करत आहेत.
एकाच घरातील व्यक्तींवर एकमेकां विरोधात तक्रारी दाखल झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले गेले आहेत.
यामुळे हा नेमका काय प्रकार आहे ? याचा पोलीस तपासा अंतीच छडा लागेल. कोणत्या कारणामुळे हे आरोप एकमेकांवर करण्यात आले आहेत? यामागे सत्य काय? यात पोलिसांना आता संबंधित संशयित आरोपींची चौकशी केल्यानंतरच सर्व प्रकार स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम