एकता कपूरच्या शोचं सूत्रसंचालन करणार ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत!

0
23

बॉलीवूड ची बिंधास गर्ल कंगना एकता कपूरच्या शोचं पहिल्यांदाच होस्ट करताना दिसणार आहे. कंगनाला पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना बघता सर्वजण उत्सुक आहेत.

नुकताच ‘बिग बॉस 15’ शो संपला. त्यानंतर हल्लीच बॉलीवूड मधील प्रसिद्द निर्माती एकता कपूरने तिच्या नवीन रिअ‍ॅलिटी शोची घोषणा केली . तिच्या मते मनोरंजन क्षेत्रातील हा शो सर्वात खतरनाक शो म्हणून ओळखला जाणार आहे. आणि असा शो प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिला नसेल. शो चा फॉरमॅट एकंदरीत बिग बॉस सारखाच असणार आहे, असे म्हंटले जात आहे. आता एकताचा हा शो कंगना रनौत होस्ट करणार असल्याची सध्या बॉलीवूड मध्ये चर्चा रंगली आहे .

एका माध्यमीय सूत्रात निर्माती एकता कपूर बोलत होती कि, या शोसाठी कंगनापेक्षा चांगली अभिनेत्री असूच शकत नाही. विशेष म्हणजे या माध्यमातून कंगना पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसणार आहे. शिवाय कंगनाने देखील या शोला होकार देण्याचे मान्य केले आहे. आणि बॉलीवूड मधील प्रसिद्धी निर्माती एकता कपूरची आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळेच एकता नं सूत्रसंचलनसाठी कंगनाचा विचार केला आहे. कंगनाचा शेवटचा चित्रपट ‘थलायवी’ पाहिल्यानंतरही एकताने तिचे तोंडभरून कौतुक केले होते.

ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा शो प्रसारित होणार असल्याचं सांगितलं अजात आहे. शिवाय हा एक लाईव्ह शो असणार आहे, जो ALT बालाजी आणि MX Playerवर प्रसारित होईल. प्रेक्षकांनी असा शो याआधी कधीच पाहिला नसेल, असा दावा केला जात आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here