द पॉईंट नाऊ ब्युरो : तरुणाईच्या उत्सवात धमाल सुरू असून अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार घडत आहेत, रंगात रंगून काही ठिकाणी बेरंग देखील व्हॅलेंटाईन विक सध्या सुरू आहे. या आठवड्यात तरुण– तरुणी प्रत्येक दिवस साजरा करत असतात. त्यानुसार ‘प्रपोज डे’ चे औचित्य साधून एका तरुणाने तरुणीला प्रपोज केला. परंतु, नकार मिळाल्याने तरुणाने नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने भर मार्केटमध्येच तरुणीसमोर आपल्या हाताची नस कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे मार्केट परिसरात चांगलाच खळबळ उडाली असून सर्वत्र बातमी व्हायरल झाली आहे. सदर प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या घटनेने तरुणाई कुठल्या वळणावर गेली याचा प्रत्य आज आला आहे.
एकतर्फी प्यार की दास्तान काय असते हे जळगावकरांना
एका तरुणाचे तरुणीवर एकतर्फे प्रेम होते. तिला प्रपोज केले असता तिच्याकडून नकार मिळाला. त्यामुळे नाराज तरुणाने फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ती तरुणी देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. तरुणी मात्र बिथरली होती तिच्या मैत्रिणींनी तिला धीर देत घरी सोडले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम