उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द नसून उशिराने भेटणार; मात्र अभ्यासक्रम पूर्ण नसलेल्या शाळा सुरू राहणार

0
35

द पॉईंट नाऊ ब्युरो : सोमवारी महाराष्ट्र शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये देखील शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता पुन्हा या निर्णयावर फेरबदल करून, उन्हाळी सुट्ट्या भेटतील पण त्या उशिरा भेटतील असे राज्याचे नवनियुक्त शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या नसून, त्या उशिराने अर्थात मे आणि जून महिन्यात भेटणार असल्याचे सांगितले आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अशाच शाळा यादरम्यान सुरू राहणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात येऊन, शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरू राहणार असल्याचा आदेश काढण्यात आला होता. यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र आता नव्याने यावर शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर यावर पडदा पडला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here