द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र राज्यात शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. त्यात शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या कारणाने जवळपास 2 वर्ष विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. त्यामुळे सर्वकाही ऑनलाइन सुरू होते. मात्र या कारणाने विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हेच नुकसान आणि मागे पडलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे विद्यार्थी, शिक्षक यांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या विसरून एप्रिल महिन्यात देखील शाळेत यावे लागेल. त्यात हे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र शाळांमध्ये किती प्रमाणात विद्यार्थी हजर राहतील याबाबत साशंकता देखील व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम