उद्योग क्षेत्रावर शोककळा राहुल बजाज यांचे निधन

0
30

द पॉइंट नाऊ ब्युरो : उद्योग क्षेत्रातील मोठे नाव ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे मार्गदर्शक राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले असून त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. बजाज हे ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने बजाज ग्रुपवर मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चे देखील शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले तर बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा सिंहाचा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तबीयतीच्या कारणास्तव गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा
राहुल बजाज १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले तर, ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here