शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेतली. काल पार पडलेल्या सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील भाषणाला उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली. याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले, फडणवीस आम्हाला गधाधारी म्हणाले. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. गाढवांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडले आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टोला लगावला. काही दिवसांपूर्वी सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई स्वतंत्र करू, मुंबई स्वतंत्र करायला ती काय पारतंत्र्यात आहे का? मूळात भाजप आणि स्वातंत्र्यांचा संबंध काय? स्वातंत्र्यावेळी भाजप नव्हता.
त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात होता. असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी जनसंघ अस्तित्वात होता परंतु लढ्यात सहभागी नव्हता. शिवसेना 25 वर्षे युतीत सडली, आता त्यांचा भेसूर आणि बेसूर चेहरा रोज दिसतोय. आम्ही अशा लोकांसोबत 25 वर्षे काढली यावर विश्वास बसत नाही, असे ठाकरेंनी म्हटले. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमच्या 106 हुतात्मांनी बलिदान देऊन मुंबई एकसंघ ठेवली आहे.
महागाई मुद्द्यावर कोणी काही बोलत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना बैठक झाली. पंतप्रधान अचानक महागाई वर बोलले. राज्यात पेट्रोल, डिझेल दर कमी केले तर GST दयावा लागनार नाही, मुंबई लुबडायची आहे. बीकेसीतून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होतेय आपण बुलेट ट्रेन मागितली का? हा सर्व मुंबई तोडण्याचा प्रयत्न आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम