(आज उदयकुमारांच्या एक्सझिट ने आनंद साजरा करणाऱ्यांनी तालुक्यात न्याय देणारा विरोधक कोण याचे नाव ‘द पॉईंट नाऊ’ कडे कळवावीत)
पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील आक्रमक नेतृत्व म्हटले की साहजिकच उदयकुमार आहेर यांचे नाव समोर येते. तालुक्यातील निवडणुका आल्यात म्हटल्यावर उदयकुमारांच्या भूमीकेकडे सर्वसामान्यसह नेत्यांचे लक्ष असायचे, मात्र शेवटच्या सभेत सांगितल्याप्रमाणे राजकीय जीवनातील शेवटची उमेदवारी अन शेवटची सभा असेल अस घोषित केले होते अन निकालानंतर राजकीय रंगमंचावरून एक्सझिट घेत असल्याचे जाहीर केले , मात्र त्यांचा हा निर्णय ‘मनाला चटका‘ लावणारा ठरला, तसेच तालुक्याच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करणारा ठरेल.
‘एक रुपया देणार नाही अन एक रुपया खाणार नाही‘ असे म्हणत भ्रष्टाचारमुक्त निवडणूक लढवली मात्र त्यांच्या या प्रयत्नांना मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला. त्यांच्या सभेत अनेकांनी अश्रू ढाळले मात्र तरी देखील मतपेटीतून मात्र धक्कादायक निकाल समोर आलेत. अन शिवसंग्रामच्या तीनही ठिकाणी पराभव झाला. या पराभव त्यांच्यासाठी साधारण असेल मात्र तालुक्यातील जनतेसाठी एक प्रामाणिक नेतृत्व गमावल्याची सल कायम मनात असेल. विधानसभेच्या निवडणूकनंतर अरुण दादाजी आहेर यांनी देखील तालुक्याच्या राजकारणातून एक्सझिट घेतली अन तालुक्याला अजूनही त्यांची उणीव मात्र भासतेय, पुन्हा एकदा तालुक्यातील मतदारांनी आक्रमक अन प्रामाणिक नेता गमावल्याची भावना सर्वसामान्यांच्या चर्चेतून समोर आली.
विरोधक आनंदोत्सव साजरा करतही असतील मात्र त्यांना विजयाचे किती समाधान आहे, प्रामाणिकपणे मतदार किती मतदान करतात याचा अंदाज नक्कीच आहे.
तालुक्यात उदयकुमार या वादळाचा राजकीय प्रवास थांबत असल्याने अनेकांना तुफानी आनंद झाला असेल मात्र सर्वसामान्यांना हा निर्णय डोळ्यात अश्रू नक्कीच आणणारा असेल.
उद्यकुमारांनी महाविद्यालयीन जीवनापासून आपल्या संघर्षाला सुरवात केली. देवळा तालुक्यातील तत्कालीन मंत्री डी एस बाबांना आवाहन दिले, शांताराम तात्यांना अंगावर घेतले, ते आज भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेरापर्यंत हा संघर्ष कायम आहे, अनेकवेळा तालुक्यातील जनतेसाठी जीवघेणा हल्ला देखील त्यांच्यावर झाला. मात्र ते जनतेसाठी लढत राहिले, तालुक्यात सत्ता नसतांना त्यांनी छोट्यामोठ्या अनेक कार्य केले आहे.
गॅस एजन्सी, शेतकरी रोखपेमेंट, सरकारी कार्यालयांचा प्रश्न, पाणीपुरवठा योजना, सूतगिरणीचा प्रश्न, लोकांचे अडकलेले पैसे मिळवून देणे, शहराला पाणीपुरवठा योजना, अशा एकना अनेक संघर्षमय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या अन जनतेसाठी आणल्या आहेत.
मात्र मतदार हा नेहमीच वैचारिक पात्रता हरवून पैशावर मतदान होत असेल तर भारतातील लोकशाही भविष्यात बदनामीच्या नावाखाली ओळखली जाईल होतकरू माणसे राजकारणात कधीही येणार नाहीत. ज्यांच्याकडे पैसे त्यांनी राजकारण करावे असा सूर कायम असेल, अन विकासाला खीळ बसेल हे दुर्दैवी असेल.
तालुक्यात राजकीय विरोधक म्हणून जो वचक उद्यकुमारांचा होता त्यांच्यामुळे देखील विकासात्मक प्रयत्न सत्ताधारी करत होते. ते राजकिय वचक कपाळ करंट्या मतदारांनी घालवला आहे हे ही तितकंच खरे आहे.
उदयकुमारांची एक्सझिट अनेकांचे संसार होरपळणारी ठरणार आहे. जिथे अन्याय होईल तिथे उदयकुमार असायचे मात्र आता उदयकुमार नसतील तर आवाज कोण उठवणार याचे आत्महपरिक्षण मतदारांनी करावे….!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम