उदयकुमारांची तोफ नगरपंचायत निवडणुकीत धडाडणार ; सभेकडे तालुक्याचे लक्ष

0
62

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुकीत आजपासून सभा सुरू झाल्या आहेत. मात्र देवळ्याचे ‘राज ठाकरे’ म्हणून गमतीने म्हणा अथवा विचाराने नेहमी म्हटले जाते ते उदयकुमार आहेरांची , शिवसंग्रामची पहिली प्रचारसभा 17 डिसेंबर रोजी होणार असल्याने खऱ्या अर्थाने या सभेमुळे राजकीय वातावरणात रंगत चढण्याची चिन्हे आहेत. या सभेचा फायदा राष्ट्रवादीसह भाजप विरोधी उमेदवारांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वॉर्ड क्र. ११ च्या उमेदवार अश्विनी उदयकुमार आहेर यांच्या प्रचारार्थ पहिली जाहीर सभा शुक्रवारी सायंकाळी ०७ : ०० वाजता पोस्टगल्लीत होणार आहे. या सभेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे, देवळा नगरपंचायत निवडणूक पाहिजे तशी रंगतदार नसल्याची चर्चा सर्वत्र होती प्रत्येकाच्या तोंडी उदयकुमारांच्या सभेची चर्चा होती अखेर सभेची वेळ न दिवस जाहीर झाल्याने नागरिकांची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली आहे.

या सभेकडे मतदार मनोरंजन म्हणून बघता की सद्विवेक बुद्धीने विचार करता यावर सर्व समीकरण अवलंबून आहेत. विशेष म्हणजे फक्त उदयकुमार आहेर भाषण न करता स्वतः आश्विनी आहेर देखील कसलेल्या आक्रमक वक्त्या आहेत. यामुळे या सभेकडे विशेष लक्ष लागून आहे.

सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना अंगावर घेता का हे बघणं महत्त्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांपासून सभा झाली नसल्याने अनेक कळीचे मुद्दे सभेत बाहेर येण्याची शक्यता आहे.

उदयकुमारांना द्यावे लागतील या आरोपांचे उत्तरे

1 . उदयकुमार आहेर पैसे घेऊन सेटलमेंट करतात.
2. कुठलेही प्रकरण तडीस नेत नाहीत.
3. विधानसभेला सोबत  मग आता का विरोधात असा सवाल उपस्थित
4. आ.राहुल आहेरांशी सलगी तर , केदा आहेरांवर  टीका करतात असा  देखील आरोप
5. विरोधाला विरोध करतात , विकास कामात अडसर
6. लोकांचे काम करतांना टक्केवारी घेतात, पैसे घेऊन काम करतात.

हे सर्व आरोप होत असल्याने जनमानसात उदयकुमारांची प्रतिमा मलिन केली आहे. लोक बोलतांना म्हणतात की हुशार, अभ्यासू असे नेतृत्व आहे पण या सवयीनमुळे, चर्चेमुळे आमचा विश्वास बसत नाही, तर काही जनता म्हणते की हे बदनामीचे कारस्थान आहे, त्यांना बदनाम केले आहे, जर नेहमी पैसे मागितले असते तर त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना अडकवले असते अशा स्वरूपाचे संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल आहेत.

येणाऱ्या प्रचार सभांमध्ये हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले नाहीत जाहीरपणे उत्तरे दिले नाही तर हे गैरसमज मात्र अजून वाढत जाणार आहेत, म्हणून या निवडणुकीत होणाऱ्या प्रचार सभा त्यांच्या राजकीय कारकीर्द ठरवणारे असतील हे नक्की.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here