द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीनंतर राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अश्विनी आहेर यांनी केलेल्या आरोपांवर अतुल पवार यांनी ‘द पॉईंट नाऊ’ कडे प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मतदारांनी पैसे घेऊन मतदान केले असे वक्तव्य करून लोकशाहीचा तसेच सुज्ञ मतदारांचा अपमान करू नका. पराभवाचे आत्मचिंतन करा. जनहिताच्या आड येणाऱ्यांना मतदार राजाने जागा दाखवली हे मान्य करा.
उठसुठ मतदारांवर पैसे घेतल्याचे आरोप करतात. तर कोणी पैसे घेऊन मतदान केले ते सिद्ध करा
जनतेत राहून कामे करावी लागतात, उठसूठ मुंबई वारी करून मोठे होता येत नाही. जनतेच्या भावना समजून घ्या त्यांना संकटकाळी मदत करा त्यांच्या सोबत उभे रहा. मात्र घरात बसून आरोप कितिदिवस करणार, सलग तीनवेळा आपल्याला मतदार नाकारताय याचे आत्मचिंतन करा असा सल्ला देखील पवार यांनी दिला.
अश्विनी आहेर यांनी 11 च्या मतदारांची माफी मागावी कारण गरीब मतदार राज्याने लोकशाहीचा मान राखत मतदान केले अन त्यांच्यावर पराभव झाला म्हणून पैश्याच्या आरोप करणे म्हणजे ‘गरज सरो वैद्य मरो’ असे झाले .माफी नाही मागितली तर 11 चा मतदार राजा परत वार्डात फिरू देखील देणार नाही. प्रत्येक निवडणूक आली की मतदारांच्या पाया पडायच्या अन पराभव झाला की त्यांच्यावर पैसे घेतल्याचा खोटा आरोप करायचा हे नेहमीचेच झाले त्यामुळे त्यांनी घेतलेल्या राजकिय संन्याशाला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
– भाग्यश्री अतुल पवार
शिवसंग्रामच्या उमेदवारांचा तीनही वॉर्डात पराभव झाला या पराभवानंतर जनमानसात हळहळ व्यक्त केली गेली, सर्वसामान्य नागरिक कट्ट्यावरील चर्चेत देखील अश्विनी आहेर निवडायला हव्या होत्या मतदार चुकलेत असा सुरू सत्ताधाऱ्यांनी कितीही नाकारला तरी सर्वसामान्य चर्चेत आहेच. मात्र निकालानंतरचे राजकारण दुर्दैवी असून उदयकुमार मात्र या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यांनी अद्याप कुठलीही भूमिका मांडलेली नाही.
उदयकुमार आहेर नवोदय क्रांतीच्या माध्यमातून देशभर कार्य करणार असल्याने ते राजकारणापासून दूर झाले आहेत, मात्र अश्विनी आहेर भविष्यात देवळ्याचा किल्ला सांभाळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे झाल्यास आक्रमक महिला नेतृत्व तालुक्यात उभारी घेईल. मात्र आहेरांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. येत्या काही दिवसात त्यांची अधिकृत भूमिका समोर येण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम