द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा अंतरिम आदेश काढून संपाला मनाई केली असून देखील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने तसेच संघर्ष एसटी कामगार संघटनेने बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप अजून मागे घेतला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा अंतरिम आदेश काढून या संपला मनाई केली आहे. परंतु त्यानंतरही संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली असली तरी राज्यातील अडीचशे पैकी ५९ डेपोंमध्ये आज काम बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. मात्र एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे कनिष्ट वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार यांना नोटीस देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
दुसरीकडे उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडेही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली. त्यामुळे आता उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम