प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयात आज दि 7 रोजी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली,
यावेळी इयत्ता 9 वीचे 82,10 वीचे 88,11 वीचे 50,12वी चे 48 अश्या एकूण 275 विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.
याप्रसंगी उगावचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पानगव्हाणे, विद्यालयाचे प्राचार्य कैलास गवळी, खडकमाळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण शिंदे,ऊगाव आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हर्षद देशमुख, डॉ अश्विनी फुटाणकर,आशा गटप्रवर्तक कल्पना राऊत, परिचारिका रेखा देशमुख, आशा वर्कर अर्चना वाघ, संगीता ढोमसे, गायत्री वाघ, मनीषा काकडे, सविता वाघ, कविता वाघ, रीना सोनवणे, ऑपरेटर तुषार देशमुख, योगेश जाधव, आरोग्यसेवक गोरक्षनाथ ताजणे, वर्गशिक्षक नंदराम ढिकले, राजाराम वाबळे, शीतल ढोमसे पाटील, बापू आव्हाड, सचिन वाबळे, राहुल दवते, प्रा संजय सानप, प्रा सीमा सोनवणे आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.
आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेतच लस उपलब्ध करून दिल्याने गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोरोना लसीकरण करून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करतो.
– कैलास गवळी
प्राचार्य,छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालय,उगाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम