देविदास बैरागी
निफाड प्रतिनिधी ; निफाड नगर पंचायत हद्दीतील उगाव रोडवरील बेघर वस्ती मागासवर्गीय व मागासलेला मजुर या बेघर वस्ती मध्ये राहतो. हि बेघर वस्ती वनविभागाच्या जागेवर वसलेली आहे की नगरपंचायतीच्या जागेवर वसलेली आहे ते आज पर्यंत स्पष्ट झाले नाही. जागेच्या वादामुळे याठिकाणी शासनस्तरावरून या ठिकाणी विकासकामे करण्यासाठी अडथळे येतात.
शासनाचा जावई शोधामुळे व राजकीय डावपेच आखत या अखंड बेघर वस्तीचे रूपांतर दोन प्रभागात करण्यात आले आहे तसेच शासकीय जागेवर दोन्ही प्रभागातील नागरिक एकाच जागेवर वास्तव्य करत आहे. या एकाच शासकीय जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना दोन ठिकाणी विभागून दोन प्रभाग करण्यात आले परंतु दुसरा प्रभाग अधिकृत झाला आहे तर अर्धा का झाला नाही. की फक्त मतदान व नगरसेवक पद डोळ्यासमोर ठेवून अर्धा भाग अधिकृत केला हा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या प्रभागात कोणतेही विकासाचे काम झाले नाही. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने येथील मतदारांनी बीजेपी पक्षावर व स्थानिक उमेदवार यांच्या वर विश्वास ठेवून निवडून दिले. काही दिवसांनी याच विजयी नगरसेवकांना आरक्षणाचा लाभ मिळाल्याने नगराध्यक्ष पद मिळाले असल्याने नगरवासियांच्या आशा पलवीत झाल्या व प्रभागात विकास मोठा होणार पण तसे झाले नाही. आशा ची निराशा पदरी पडली. त्यामुळे ठेच लागलेला येथील मतदार राजा अस्सल चोवीस कॅरेट सोन्यासारखा उमेदवार या वेळी नक्कीच निवडून देणार की थापड्यांना संधी देणार हि वेळ च ठरविलं.
निफाड ग्रामपंचायत असतांना हा वार्ड विकासा कामांपासून वंचित व वंचित च राहिला. ग्रामपंचायत काळात काही प्रमाणात निधी येऊन थोड्या प्रमाणात निवडक विकासकामे झाली.निफाड
ग्रामपंचायतीचे रूपांतर निफाड नगरपंचायत मध्ये झाले व ते झाल्यापासून नगरपंचायतला कोटीने निधी राज्य सरकारने नगरपंचायतला विकासासाठी देऊन हि पाच वर्षात या प्रभागामध्ये पाहिजे तसे विकासाच्या दृष्टीने नियोजन पद्धतीने कामे झाले नाही.या प्रभागाची सर्वात मोठी समस्या पुरुषांच्यासाठी शौचालय पिढ्यानपिढ्या नाही, गटार, स्ट्रीट लाईटकडे दुर्लक्ष. या प्रभागातील नागरिक पंतप्रधान घरकुल लाभापासून कायम वंचित राहिले आहे.घराचे स्वप्न कधीच पूर्ण होणार की अपूर्ण च रहाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रभागात उगाव रोडवर चिकन, मांस विक्री होत असल्याने डुकरे, कुत्रे आक्रमक होतात.
यासाठी मांस विक्रेते करीता उगाव रोड लगत शॉपिंग सेंटर झाल्यास उघड्यावर मांस विक्री होणार नाही. यासाठी येथे मांस विक्री करण्यासाठी शॉपिंग सेंटर बांधण्याची गरज आहे. यासाठी नगरपंचायत सह स्थानिक नगरसेवक यांनी विकासासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करायला हवा होता परंतु तसा दिसून आला नाही. बेघर वस्ती मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न केले. निवेदन दिले, आंदोलने केली व त्यांना काही प्रमाणात यश मिळाले परंतु नगरपंचायत व नगरसेवक यांनी थोडे फार प्रयत्न करण्याची गरज होती. ठिकाणी स्ट्रीट लाईट ची व्यवस्था कमकुवत असल्याने स्ट्रीट लाईट कधी सुरू तर कधी बंद अवस्थेत असते.या बेघर वस्तीला हागणदारी मुक्त म्हणू शकत नाही. प्रभाग मधील नगरसेवक यांनी पाच वर्षात कोणते विकास कामे केली ते येत्या निवडणूक प्रचार दरम्यान आरोप प्रत्यारोप करतांना स्थानिक नागरिकांना दिसून येईल. प्रभाग पाच चहूबाजूंनी विविध समस्यांनी गांजलेला प्रभाग त्यामध्ये बिजेपी पक्षाचे विद्यमान नगरसेवक यांनी पाच वर्षात प्रभागात रस्ते, पाणी, गटार प्रश्न सोडविले नाही. प्रभागातील रस्ते, गटार कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.
बेघर वस्तीचा विकास झाला नसल्याने स्थानिक मतदार नाराज आहे. त्यामुळे नविन उमेदवारी करणाऱ्यास खुंटलेल्या विकासाची डोके दुःखी कुणाच्या मुळावर मतदानरुपी घाव घालणार ते काही महिन्यातच स्पष्ट होईल. या वस्ती मध्ये स्ट्रीट लाईट नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे येथे स्ट्रीट लाईट बसविण्यात यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या शौचालय युनिट मध्ये रात्रीच्यावेळी लाईट नसते. त्यामुळे शौचालय असून खोळंबा असे आहे. हा प्रभाग इतका मागासलेला ठेवला आहे की ग्रामपंचायत ते नगरपंचायत झाल्यापासून येथील पुरुष मंडळींसाठी शौचालय युनिट आज पर्यंत बांधण्यात आले नाही. शासनाने ठरविलेल्या हागणदारीमुक्त अभियानास याठिकाणी “मोकळ्या जागेवर”हवेशीर अभियान राबविण्यात येत आहे.असे अनेक कामे या प्रभागात प्रलंबित आहेत. प्रभाग विकास कामांपासून वर्षानुवर्षे वंचित व मागासलेला आहे. या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा पाहण्यासारखी आहे.गटार उघड्यावर असल्याने घरात दुर्गगंधीयुक्त वास येत आहे.
पाणी पुरवठा हि समस्या कायमच पाचवीला पूजल्यासारखी भेडसावत आहे.या नगरात जाण्यासाठी चिवळ रस्ता व नवीन रस्त्याचे काम बाकी आहे आहे.गटारी तर उघड्यावर असल्याने व तुटलेल्या असल्यामुळे गटार परिसरात दुर्गंधी सह डास वाढल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे. तुटलेल्या गटारी चे नवीन कामे होणे गरजेचे आहे. येथील गटारी भूमिगत झाल्यास दुर्गंधी व डासांचे प्रमाण कमी होऊन आरोग्याचा प्रश्न सुटेल. रस्त्यांची खूपच बिकट परिस्थिती आहे. तुटलेफुटलेले असल्याने कायमच येण्या जाण्यासाठी अडचणी येतात. हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागासलेल्या व गृहीत धरून ठेवलेला प्रभाग कायम विकासापासून दुर्लक्षित ठेवला गेला आहे. त्यामुळे येथील मतदार समस्यांपासून प्रचंड प्रमाणात ग्रासलेला असल्याने नविन उमेदवाराच्या पाठी उभा असणार की पुन्हा भूलथापांना व मोहमायाच्या जाळ्यात अडकून पाच वर्षे विकासापासून दूर रहाणार हे निवडणूक दरम्यान दिसून येईल.
शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,बीजेपी व निफाड शहर विकास आघाडी चे उमेदवार साम, दाम,दंड भेद घेऊन उतरणार असल्याने व या प्रभागात पूर्वीच्या बिजेपीच्या नगरसेवकाने विकास कामांकडे लक्ष न दिल्याने हि निवडणूक मतदारांची एक प्रकारे महा पर्वणीच ठरणार. या प्रभागात अर्थिक उलाढाल हि मोठ्या प्रमाणात होणार असली तरी मतदार आता भूलथापांना बळी न पडता प्रभागात काम करणाऱ्या योग्य उमेदवारास पसंती देणार. बेघर वस्ती मध्ये मागील पंचवार्षिक निवडणूकित स्थानिक उमेदवारास पसंती देत निवडून दिले परंतु हा प्रभाग विकासापासून कोसो दूर राहिला त्यामुळे या प्रभागातील नागरिक ताक हि फुंकून पिणार असे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या सारखे यावेळी कुणाच्याही थापांना भुलता योग्य उमेदवार या प्रभागातून निवडुन जाणारा यात तीळ मात्र शंका नाही.
निफाड नगर पंचायत प्रभाग क्र ५ मधून नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या नगरसेवक यांनी पाच वर्षात प्रभागाचा विकास झाला नसल्याने प्रभाग भकास झाल्यामुळे नवीन उमेदवारास प्रभागात संधी मिळणार यात शंका नाही.या प्रभागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली असून या ठिकाणी गटारी उघड्या वर या सह प्रभागात सर्वात मोठे प्रश्न रस्त्यांचे सुटले नाही. स्ट्रीट लाईट च नाही असे अनेक प्रश्न आ वासून उभे ठाकले आहे. त्यामुळे येत्या निवडणूक दरम्यान प्रलंबित कामांचा व आश्वासनांच्या पावसाचा हिशोब निवडणूक दरम्यान मतदार बंधूंना द्यावा लागेल. न केलेल्या कामाची मतदार राजा दखल घेऊन नवीन कार्यक्षम इच्छुक उमेदवाराला पसंती देणार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम