ईनरविल क्लब अपेक्स सटाणा यांचा एक अनोखा उपक्रम क्लब सदस्यांकडून अग्नीशमन दलातील जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण जल्लोषात साजरा

0
59

देवळा: ईनरविल क्लब अपेक्स सटाणा सदस्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.यावेळी अग्निशामक दलाचे प्रदिप पवार, दत्तात्रेय नंदाळे, बापु नंदाळे, अनिल निकम, दोधा सोनवणे, भुषण सोनवणे, अतीश गायकवाड, राजेंद्र आहेर, किशोर सोनवणे, विवेक देवरे, धनंजय सोनवणे असे ११ जवान या सोहळ्यास हजर होते.

संस्थापक अध्यक्षा वर्षा शिरोडे यांच्या संकल्पनेतून २०१७ साली स्थापन झालेल्या ग्रुपच्या नवीन अध्यक्षा योगिता शिरोरे व उपक्रम संकल्पक वंदना भामरे यांनी
“जिथे संकट गंभीर तिथे अग्नीशमनदल खंबीर” या उक्तीप्रमाणे जवान आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीने सर्व जवानांचे औक्षण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा योगिता शिरोरे सचिव सुवर्णा जंगम, आयएसओ वंदना भामरे संस्थापक अध्यक्षा वर्षा शिरोडे ,कल्पना येवला, अपर्णा येवलकर, माधुरी अमृतकर, अर्चना सोनवणे, मनिषा अमृतकार, अॅड रेखा शिंदे ,सुरेखा बच्छाव आदी महिला उपस्थित होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here