द पॉईंट नाऊ ब्युरो : ईडीने आता शिवसेना नेते संजय राऊत यांनाही दणका दिला आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. राऊत यांचा अलिबागमधील भूखंड आणि दादरमधील फ्लॅट ईडीद्वारे जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 1034 कोटींच्या पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे.
मागील काही दिवसांत ईडीद्वारे कारवाई करण्यात येऊन बऱ्याच जणांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. त्यात शिवसेना नेते संजय राऊत देखील ईडीच्या रडारवर होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईबाबत पूर्वकल्पना होती. पोलिसांचा वापर करून कारवाई टाळता येणार नव्हती. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हणत, पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा काय रोल होता, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आता संजय राऊत या कारवाईबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम