इमारत बांधकाम अपघातात 6 मजुरांचा गेला बळी

0
45

द पॉईंट नाऊ ब्युरो (पुणे) : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील शास्त्रीनगरमध्ये ही घटना घडली असून, यात 3 मजूर जखमी देखील झाले आहेत.

कोणत्याही प्रकारच्या इमारतीचे बांधकाम होत असेल. तर त्यात मजूर हा अतिशय महत्वाचा भाग असतो. त्याच्या मेहणतीवरच इमारतीचे काम पूर्ण होत असते. यासाठी या मजुरांच्या सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेतली जायला हवी. मात्र पुण्यात घडलेल्या या घटनेने या इमारतीच्या कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली गेली होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान या घटनेत 10 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here