इतिहासातील महापुरुषांनी ज्ञानसाधनेतून साधले समाजहित – दशमुखे

0
40
येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त अतिथी संवाद साधतांना कवी किरण दशमुखे, समवेत प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर. (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; इतिहासातील अनेक महापुरुषांनी पुस्तके वाचत या ज्ञानसाधनेतून आपले आणि समाजाचे हित साध्य केले. असे प्रतिपादन कवी किरण दशमुखे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर हे होते.

येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त अतिथी संवाद साधतांना कवी किरण दशमुखे, समवेत प्राचार्य हितेंद्र आहेर व इतर. (छाया – सोमनाथ जगताप )

ते पुढे म्हणाले कि, सार्थ भविष्याचा वेध घेण्यासाठी आणि विकासाचा हात धरण्यासाठी समाजाला डॉ.कलामाच्या विचारांची आणि पुस्तकांची कास धरण्याची मोठी आवश्यकता आहे. इतिहासात डोकावुन पाहता सर्वच समाजसुधारकांनी वाचनातून व्यक्ती ते देश स्वातंत्र्य पर्यंत आपले विचार मांडले. उपप्रचार्या डॉ.मालती आहेर यांनीही शिवाजीराव भोसले यांचे ‘आपले घर’ याविषयीची संकल्पना मांडली. यावेळी प्राध्यापकांनी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ललितगद्य, नाटकातील काही प्रसंगांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून वाचन करत डॉ.कलमांच्या विचारांचा जागर केला.

मराठी विभाग प्रमुख प्रा.रवींद्र पगार यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगितले. तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.एस.डी.ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ.ए.बी.पवार, बी.के.रोंदळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे.जिल्हा समन्वयक डॉ.डी.के.आहेर, सर्व विषयांचे विभागप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, ग्रंथालय प्रमुख, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.संदिप वळवी यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here