इकडे नवरी त्याची वाट पाहत राहिली; तो मात्र दुसरीलाच घेऊन पळाला

0
16

द पॉईंट नाऊ ब्युरो : लग्नाचा मुहूर्त जवळ आला अन नवरा मुलगाच पळून गेला. अशी घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली आहे.

बामोरा या गावात लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. अजय पलासिया आणि काजल यांचा विवाह होणार होता. मात्र नवरा मुलगा दुसऱ्याच मुलीसोबत पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे बोलले जात आहे.

नवऱ्या मुलीकडचे लोक वऱ्हाडाची वाट पाहत होते. वऱ्हाड तर नाही, मात्र नवऱ्या मुलाकडच्या लोकांचा संदेश आला की, ते येऊ शकत नाही. यामुळे दोन्हीही कुटुंबांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पोलिसांनी तपास केल्यानंतर नवरा मुलगा दुसऱ्या मुलीसोबत पळून गेल्याचे निष्पन्न झाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here