द पॉईंट नाऊ ब्युरो : पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीचा दणका अजूनही सुरूच आहे. सोमवारी इंधनाचे दर अजून वाढले. इंधनाच्या दरवाढीचा हा आलेख असाच चढत राहिला, तर इंधन लवकरच 150 रुपयांच्या पार पोहोचेल, अशीच चिन्हे आहेत.
सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर 119.67 रुपये आणि डिझेलचे दर 103.92 पैशांवर पोहोचले. यामुळे सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ अजून तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल – डिझेलचे दर महाराष्ट्रात अधिक आहेत. दिल्लीत पेट्रोल 104.61 रुपये आणि डिझेल 95.87 रुपये, चेन्नईत पेट्रोल 110.09 रुपये आणि डिझेल 100.18 रुपये, कोलकाता मध्ये पेट्रोल 114.28 आणि डिझेल 99.02 रुपये, पाटण्यात पेट्रोल 115.40 आणि डिझेल 100.27 आणि सध्याच्या घडीला पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात कमी म्हणजे पेट्रोल 90.72 रुपये आणि डिझेल 85.09 रुपये इतके भाव आहेत.
जागतिक बाजारपेठेत होत असलेल्या दरवाढीचा फटका भारतात देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सांगण्यानुसार केंद्र सरकार इंधन दरवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित इंधनाचे दर कमी होऊ शकतील. मात्र इंधनाचे दर आत्ताच या स्तरावर पोहोचल्याने कमी करून करून केंद्र सरकार किती कमी करेल, असा सवाल सामान्य नागरिकांद्वारे केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम