द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: महाराष्ट्रातील इंजिनीअरिंग करू इच्छित असलेल्या , मात्र भाषेची अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आपल्या मातृभाषेतून अर्थात मराठीतून देखील करता येणार आहे. यामुळे भाषेची अडचण असणाऱ्या मात्र इंजिनीअरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या दूर होणार आहे.
केंद्र शासनाद्वारे आता इंजिनीअरिंग चे शिक्षण मराठीसह पाच भाषांमध्ये शिकवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात बाह्यतांश प्रकारचे व्यावसायिक शिक्षण हे मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होते. परंतु, या प्रकारचे शिक्षण हे मातृभाषेत आल्यास विद्यार्थ्यांना ते ज्ञान आत्मसात करण्यास अधिक सोपे जाईल आणि त्यातून नक्कीच अधिकाधिक विद्यार्थी घडतील या विचाराने केंद्र शासनाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम शिकतांना भाषेचे बंधन नको असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांनी इंजिनीअरिंग अभ्यासक्रम आता मराठीसह इतर पाच भाषांमध्ये शिकता येईल असे त्यांनी सांगितले.
देशातील आठ राज्यांमधील १४ इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम मराठीसह पाच भाषांमध्ये असणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि बांग्लामध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रम आता विद्यार्थ्यांना शिकता येईल.
बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीमुळे इंजिनीअरिंग शिक्षण घेता येत नाही. मात्र आता देशभरातील १४ इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी या पाच भाषांपैकी त्यांना अपेक्षित असलेली भाषा निवडुन इंजिनीअरिंग चा अभ्यासक्रम शिकू शकतील.
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचे अकरा भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणारे टूल देखील विकसित करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधते वेळी सांगितले. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऐकू येण्याची व बोलण्याची असणारी अडचण असते, अशा विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेद्वारे शिकता येणार आहे. यासाठी डिजिटल पुस्तक तयार करण्यात आल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील आणि अधिकाधिक विद्यार्थी यातून घडतील हे मात्र नक्की.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम