नाशिक प्रतिनिधी : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून देवळा तालुक्यातील गरजू शाळा व संस्थांना शनिवार (दि.२९) रोजी संगणक वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम येथील ग्लोबल व्हिजन इंडिया बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या आवारात घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील ग्लोबल व्हिजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर आहेर यांनी केले.
यावेळी डॉ.सुदर्शन निकम, नगरसेवक जितेंद्र आहेर, संतोष शिंदे, वंदे मातरम प्रतिष्ठानचे श्याम शिंदे, मुन्ना अहिरराव, तुषार खैरनार, सचिन चिमणपुरे, सुनील आहेर, आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीही आमदार डॉ.तांबे यांनी देवळा तालुक्यातील शाळांना संगणक दिले आहेत. आता पुन्हा संगणक भेट दिल्याने मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी-पालक यांनी आनंद व्यक्त केला. आमदार डॉ.तांबे या कार्यक्रमास उपस्थित नसले तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तंत्रस्नेही होत या माध्यमातून शाळांचा गुणवत्ता विकास साधला जावा असा आशावाद त्यांनी संदेशाद्वारे व्यक्त केला.
या शाळा व संस्थांना दिले संगणक भेट
आदिवासी प्राथमिक आश्रमशाळा उमराणे, कर्मवीर रामरावजी आहेर माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, जिल्हा परिषद शाळा भौरी, अनुदानित आश्रमशाळा दहीवड, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कृषी विद्यालय खालप, ज्ञानेश्वर माउली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे, जनता विद्यालय लोहोणेर.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम