नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : 29 जानेवारी रोजी चांदवड तालुक्यातील निंबाळे हिवरखेडे व बोपाने या गावातील विकास गावचे भूमिपूजन डॉ.राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
निंबाळे येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष रु. अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करणे ८.५० लाख रु, निंबळे-चौकी रस्ता सुधारणा करणे २५ लक्ष रु.चांदवड राज्य मार्ग ७ निंबळे ते समीट रोड बनविणे ४८ लक्ष रु.हिवरखेडे येथे आमदार निधी अंतर्गत फ्लेवर ब्लॉक बसवण्यात १०लक्ष रु. जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत दलित वस्तीत व्यायाम शाळा बांधणे ७ लक्ष रु.२५१५ योजनेअंतर्गत स्मशानभूमी परिसरात प्लेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष रु.बोपाने येथेआमदार निधी अंतर्गत सभा मंडप बांधणे १० लक्ष रु., दिघवद-बोपाने येथील गोई नदीवर पूल बांधणे ९८ लक्ष रु., बोपाने ते चांदवड रस्ता बनविणे (जि. प.निधी) ४० लक्ष रु., बोपाने ते दिघवद रस्ता बनविणे (जि. प.निधी) २० लक्ष रु. या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, मा. सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, डॉ. राजेंद्र दवंडे, महिला मोर्चा अध्यक्ष गीता ताई झालटे, गणेश महाले, योगेश ढोमसे, वाल्मीक पवार, मिलिंद खैरे, नवनाथ गांगुर्डे, कैलास गुंजाळ, संजय पाडवी, योगेश साळुंखे, पिंटू भोईटे, वर्धमान पाण्डे, राहुल हँडगे, विठ्ठल आवारे, राज पाटील, देविदास आहेर, पुंडलिक गुंजाळ, नंदकुमार चौधरी, ज्ञानेश्वर ठाकरे, मुकेश आहेर, दिगंबर वाघ, अमर मापारी, कैलास खैरे, बाजीराव वानखेडे, वाल्मीक वानखेडे, गुणवंत ठोके, तसेच ग्रामस्थ व सरपंच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम