देवळा प्रतिनिधी : देवळा येथील आशापुरी महिला पतसंस्थेस ३१ मार्च २०२२ अखेर ७ लाख ७२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्षा कोमल कोठावदे यांनी दिली .
संस्थेकडे दि ३१मार्च अखेर २ कोटी २९ लाखाच्या ठेवी जमा असून २ कोटी ०७ लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेचे वसूल भागभांडवल ७० लाखाचे असून विविध प्रकारचा निधी १९ लाख जमा झालेला आहे .संस्थेने विविध वित्तीय संस्थांमध्ये १ कोटी १७ लाखाची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे .संस्थेचे खेळते भाग भांडवल ३ कोटी ३७ लाखाचे असून सीडी रेशो चे प्रमाण ६६ टक्के आहे .८०२ सभासद संख्या असलेल्या पतसंस्थेचे थकबाकीचे प्रमाण ४ टक्के आहे. संस्थेस स्थापनेपासूनच ऑडिट वर्ग अ प्राप्त झालेला आहे .संस्थेने नुकताच १५वर्षांच्या कार्यकाळाचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेने आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक कार्यातही मोठे योगदान नोंदवलेले आहे .
संस्थेच्या प्रगतीत खरे (उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक) सुजय पोटे (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा )संचालक मंडळ ,कर्मचारीवृंद ”अल्पबचत प्रतिनिधी ,यांचा मोलाचा वाटा आहे. याप्रसंगी संस्थेचे व्हाइस चेअरमन श्रीमती सिमा मेतकर, कार्यकारी संचालक दिपाली जाधव, संचालिका प्रियंका कोठावदे, अलका शिरोरे, शितल अहिरराव, विमल धामणे, वंदना आहेर, छाया निकम, अर्चना वाघमारे, प्रिती ठक्कर व्यवस्थापक अनिता आहेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम