प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनच्या वतीने गुणवंत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्रंबकेश्वर येथील जाईबाई धर्मशाळा या ठिकाणी आयोजित या सोहळ्यात निफाड येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ रोहित धोक्रट यांना वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ धोक्रट यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेत निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या कोविड रुग्णांवर उपचार केले, त्यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिले, याबद्दल त्यांना आविष्कार संस्थेने सन्मानित केले, या पुरस्कार सोहळ्याला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, राममूर्ती रायसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ धोक्रट यांचे निफाड डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम