आळेफाटा येथील कुटुंबावर काळाचा घाला

0
48

मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा मालवण समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे आळेफाटा परिसरात शोककळा पसरली आहे.

सिंधुदुर्ग मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा बोट बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. बोट बुडाल्याने सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी 24 रोजी मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यांवर आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे कुटुंबियांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्या करता गेले होते. आपल्या कुटुंबीयांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. तारकर्ली बीचवर 20 जणांना घेऊन बोट स्कूबा एकडायव्हिंगसाठी समुद्रात गेली होती. स्कूबा डायव्हिंगवरून परतत असताना हा घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक .

उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरू झाले. यामधे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय 45) यांचाही समुद्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बोट या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत डॉ. स्वप्नील पिसे यांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आकाश देशमुख याचादेखील यात मृत्यू झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here