आली दिवाळी दिवाळी आला आनंदाचा सण माझा शेतकरी बाप…….

0
61

आली दिवाळी दिवाळी
आला आनंदाचा सण
माझा शेतकरी बाप
त्याची आहे वणवण

पीक विकून घेऊया
म्हणे दिवाळी बाजार
पीक विकलं विकलं
झाले रुपये हजार

बाप हजार रुपये
पुन्हा पुन्हा पाहतोय
नाही सुखाची दिवाळी
आसवात नहातोय

बाप जगाचा पोशिंदा
घेई किलोची साखर
पहा काय दशा त्याची
ज्याचा बीघ्याचा आखर

सार्‍या पिकांचेच भाव
घसरून खाली आले
सरकार दरबारी
टीका टिपणीच चाले

लोक सांगती बापाला
बीघा दीड बीघा विक
बाप म्हणे माती माय
तिला विकणे का ठीक..?
बाप म्हणे माती माय
तिला विकणे का ठीक..?

काजल आहेर -शेलार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here