द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वाखारवाडी ता .देवळा व सध्या नाशिक स्थिर आर्यन अजय वाघ
याची जागतिक स्तरावर झालेल्या IELTS या परीक्षेत नऊपैकी आठ ब्रँड मिळवित जगातील नामांकित मॅंचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बारावी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेत आर्यन याने घवघवीत यश संपादन केले.
आर्यन हा नाशिक येथील नामांकित डॉ.अजय वाघ व डॉ. प्रतिभा वाघ यांचा मुलगा व ‘मविप्र’ चे देवळा तालुका संचालक डॉ.विश्राम निकम यांचा नातू आहे. आर्यनच्या यशाबद्दल डॉ. विश्राम निकम,हिरामण वाघ,डॉ. निशांत गांगुर्डे, डॉ.स्नेहल गांगुर्डे,डॉ. पंकज निकम, डॉ. सोनल निकम, डॉ. चंद्रकांत निकम,कसमा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण पवार, रविंद्र निकम ,शरद निकम , मालेगाव येथील युवा उद्योजक रोहित पवार, प्रशांत पवार, स्वामी पवार आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम