द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department) तब्बल 6 हजार 205 विविध पदांसाठी येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा (Examination) घेण्यात येणार होती .
मात्र 24 तारखेला रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे संदेश विद्यार्थ्यांना आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
शासनाच्या वेबसाईटवर मात्र अशी कुठलीही सूचना अपडेट करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थी मात्र गोंधळात सापडले आहेत.
सरकारचा भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी एक दिवस याआधीच शहरात दाखल झाल्याने त्यांना आर्थिक फटका देखील सोसावा लागणार आहे.
ABP माझा ने देखील परीक्षा रद्द झाल्याची बातमी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी गोंधळात न पडता आलेला msg हा अधिकृत समजावा तसेच वेबसाईट चेक करत रहावे.
अधिकृत माहिती आल्यास आम्ही आमच्या वेबसाईटवर अपडेट करू
thepointnow.in – या वेबसाईटवर देखील परिक्षार्थींनी लक्ष असू द्यावे.
उद्या होणारी आरोग्य सेवेची परीक्षा ही, विद्यार्थ्यांनी केलेल्या हॉलतिकीटचा तक्रारीमुळे रद्द झालेली आहे.तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
One more huge failure of government management, this will be the very bad gift to Pharmacist on World Pharmacist day….