द पॉइंट नाऊ ब्यूरो : पंजाबचे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या एका धडाडीच्या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. लाच घेतली असल्याचा आरोप सिद्ध झाला असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्रिमंडळामधील आरोग्यमंत्र्यांना पदावरून काढले गेले आहे. मंत्री विजय सिंगला यांनी पदाचा राजीनामा द्यावा असा आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळामध्ये विजय सिंगला हे आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सिंगला यांच्यावरील हे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने मान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
विजय सिंगला यांनी अधिकाऱ्यांकडून १ % कमिशनची मागणी केल्याचा तसेच भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हे सर्व सिद्ध झाल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर तात्काळ निर्णय घेत मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढले. मान यांनी सिंगला यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून काढतांना ते म्हणाले की, आमच्या मंत्रिमंडळात एक भ्रष्टाचाराला एक टक्का ही थारा नाही. जनतेने आम आदमी पक्षाच्या सरकारला मोठ्या विश्वासाने साथ दिलीये. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, असे मुख्यमंत्री मान म्हणाले.
दरम्यान, आपल्याच पक्षातील मंत्र्यांला मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय पंजाबमध्ये पहिल्यांदा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा निर्णय पक्षातील इतर नेत्यांसाठीही कठोर इशारा असल्याचं चर्चा केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम