देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील वाखारीचे भूमिपुत्र व नाशिक येथील लीलावती हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रसाद निकम हे कसमादेवासीयांसाठी आरोग्यदुत ठरत आहेत.
कोरोनाकाळातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने शनिवारी( दि ११) रोजी सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे संचालक डॉ.व्ही.एम.निकम होते . कसमादे परिसरातील डॉक्टर व मित्रपरिवाऱ्यांच्या वतीने डॉ.प्रसाद निकम यांना सपत्नीक कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
कोरोना वैश्विक महामारीच्या दुसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती . ग्रामीण भागात देखील कोरोनाने हाहाकार माजवला होता. अश्या वेळी उत्तर महाराष्ट्रातील बाधित रुग्णाना आपला हक्काचा माणूस म्हणून डॉ.प्रसाद निकम यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले .
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अनेक रुग्णांणी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.प्रसाद यांनी देवदूत प्रमाणे आमच्या आरोग्याची काळजी घेतली असून , त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी वाजगावचे उपसरपंच बापू देवरे,विजय पगार ,गोविंद पगार ,शांताराम उर्फ बंडू आहेर, दिनकर देवरे ,भारत कोठावदे , चंद्रकांत आहेर, कैलास आहेर, मुन्ना देवरे, राजेंद्र अहिरराव ,रवींद्र निकम, पंकज जाधव आदींसह कळवण देवळा मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते.भगवान आहेर यांनी प्रास्ताविक केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ संजय निकम यांनी विशेष परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम