आराई ग्रामपंचायतिच्या वतीने उपोषणाचा इशारा अन प्रशासन जागे

0
12

स्वप्निल आहिरे,
आराई प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील आराई गाव त्यातून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावांपैकी एक आणि विशेष म्हणजे ज्या गावात येण्यास असणारे अनेक रस्ते परंतु ते रस्ते की शेतात जाण्यासाठी असणारी पांधी? अगदी रस्त्यांवर काटेरी झाडांनी अतिक्रमण केलेले. संबंधित काटेरी झाडांमुळे अनेकदा समोरून येणारे वाहन न दिसत असल्यामुळे छोटे मोठे अपघात झालेत काहींना किरकोळ दुखापत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्याने व संबंधित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने अडथळे निर्माण होत होते. परंतु तरीही ग्रामपंचायतीने अनेकदा स्वयंपूढाकाराणे ती काटेरी झाडे काढून नागरिकांची गैरसोय सोडवली परंतु म्हणतात ना रोज मरे त्याला कोन रडे तसेच झाले.

ग्रामपंचायतीने अनेकदा संबंधित काटेरी झाडे काढून घेण्यासाठी पत्रव्यवहार केला अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना भेटून समस्या सांगितली परंतु विभागाने त्यास प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून पत्रव्यवहार करूनही ती काटेरी झाडे काढली न गेल्याची खंत ग्रामपंचायत प्रशासनास सतावत होती आणि अखेरीस त्यांनी संबंधित विभागाच्या हलगर्जी कारभारास धडा शिकवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर झोपलेले प्रशासन जागे झाले, म्हणतात ना नाक दाबल्याखेरिज तोंड उघडत नाही अगदी तसेच काहीसे… ग्रामपंचायतीने विभागास लवकरात लवकर काम करून मिळावे अन्यथा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आणि त्याची दखल घेत विभागामार्फत आराई फाटा ते वासोळ केटीवेअर् पर्यंतच्या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झाडे काढण्यासाठी जेसीबी मशिन पाठवून कामास सुरुवात करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच मनिषा अहिरे उपसरपंच अनिल माळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधवराव अहिरे डॉ.गोकुळ अहिरे, सुधाकर भामरे, वसंत अहिरे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here