प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तालुक्याचा सर्वागीण विकास साधणार वडाळी नजिक येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार दिलीपराव बनकर यांचे प्रतिपादन
२००४ ते २००९ या कालावधीमध्ये निफाड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निफाडच्या जनतेने काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या कालावधीमध्ये तत्कालीन शासनाच्या माध्यमातून करोडो रुपयाच्या निधी उपलब्ध करून निफाड तालुक्याचा सर्वागीण विकास साधला त्यानंतर १० वर्ष सातत्याने निफाड तालुक्यातील नागरिकांच्या संपर्कात राहून शक्य होईल तेवढी विकास कामे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच कामाची पावती म्हणून निफाडकरांनी पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचे सोने करत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निफाड तालुक्याचा सर्वागीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी केले. वडाळी नजिक येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आमदार म्हणून निवड झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोना महामारीने थैमान घातले.सुरवातीला प्रथम आरोग्य यंत्रणेकडे लक्ष केंद्रित करीत ग्रामीण तालुक्यातील जनतेला चागली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, ऑक्सिजन जनरेशन प्लांट अशा विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची तरतूद केली.
त्यासोबत वडाळी नजिक, कारसूळ सह परिसरातील गावांची कादवा नदीवर पुल व्हावा हि सातत्याने मागणी विचार करून अर्थसंकल्प सन २०२०-२१ मध्ये इतर विविध विकास कामांसोबत कादवा नदीवर सुमारे रु.१२ कोटी निधीचा पूल मंजूर करून पुढील एक वर्षात सदर पुलाचे काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील शेतकरी,नागरिक, विद्यार्थी यांना पिंपळगाव सारख्या बाजार पेठेच्या जवळचा मार्ग निर्माण होणार आहे. कादवा नदीवरील या पुलासोबत नांदुरमध्यमेश्वर चे वाढीव गेटचा प्रस्ताव निफाड, रानवड साखर कारखाना, निफाड ड्रायपोर्ट, तालुक्यातील रस्ते, सायखेडा चांदोरी येथील गोदावरी नदीवरील पूल, साकोरे उंबरखेड मधील कादवा नदीवरील पूल अशा विविध विकास कामे लवकरच मार्गी लागणार आहे.
याप्रसंगी वडाळी नजिक ते पद्मावती रस्त्याची सुधारणा करणे रु.१५ लक्ष, वडाळी नजिक खंडेराव महाराज मंदिराजवळील रस्त्याची सुधारणा करणे रु.५ लक्ष, अहिल्याबाई होळकर सभागृह बांधणे रु.१० लक्ष या कामाचा भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव ढेपले, देवराम मोगल, सुभाष होळकर, राजेंद्र डोखळे, मोतीराम झाल्टे, सुरेश मोरे, कैलास होळकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी तानाजीराव बनकर, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, संजय मोरे, रामभाऊ माळोदे, सुभाष कराड, सोमनाथ मोरे, दिपक बोरस्ते, पंचायत समिती सभापती सुलभा पवार, गणेश बनकर, विश्वास मोरे, सागर कुंदे, भूषण धनवटे, जयराम मोरे, अनिल बोरस्ते, नितीन ताकाटे, अजय गवळी, बाळासाहेब गवळी ,शरद गवळी, सुनील गवळी, संजय गवळी उमेश मोरे, रविंद्र शिरसाठ, नाना पाटील, आंनद भंडारे, भाऊसाहेब भंडारे, माणिक सरोदे, गणपत मोरे, धनराज भंडारे, डॉ.राहुल घायाळ, सिद्धार्थ वनारसे, भूषण शिंदे, राजेंद्र निरगुडे, पृथ्वीराज मोगल, खंडेराव मोगरे, बाळासाहेब होळकर, मोतीराम झाल्टे, विष्णुपंत होळकर, रमेश झाल्टे, बाळासाहेब झाल्टे, भाऊसाहेब फटांगडे, गोकुळ झाल्टे, मधुकर मोगरे, मंगेश होळकर, विश्वास झाल्टे, छबू कडलग, रोहन होळकर, चंद्रशेखर होळकर, प्रकाश शिंदे, रामेश्वर होळकर, दौलत कडलग, वाल्मिक घोलप, संपत झाल्टे, दिलीप झाल्टे, विठ्ठल मोगरे, राजाराम मोगरे, प्रताप झाल्टे, ठेकेदार दिघे, वडाळी नजिक ग्रामपंचायत उपसरपंच विनायक घोलप, सदस्य बाळासाहेब घोलप, विजय होळकर, दिपाली झाल्टे, मंगला मोगरे, वैशाली कडाळे, वैशाली कराटे, कानिफनाथ कराटे, ग्रामविकास अधिकारी सोनाली सांगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोसावी, सहाय्यक अभियंता छापरवाल, बाविस्कर, दंडगव्हाण आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम