आमची विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित! देवळ्याच्या कारभारीन भारती आहेरच

0
37

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच असतांना, कोण नगराध्यक्ष होणार याकडे लक्ष लागून होते, आज नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व्यांचे अंदाज चुकवत एकमेव अर्ज – भारती अशोक आहेर(माजी जि प सदस्य ) यांचा आला, सूचक – संजय तानाजी आहेर तर अनुमोदक म्हणून अशोक संतोष आहेर यांनी सही केली आहे.

देवळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागून होते, ‘द पॉईंट नाऊ’ ने दिलेल्या बातमीवर शिक्का मोर्तब झाला असून औपचारिक घोषणा बाकी आहे, भारती आहेर ह्याच देवळ्याच्या कारभारीन असणार आहेत हे मात्र स्पष्ट झाले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी मध्य मार्ग काढत गटबाजी होण्यापासून वाचवत सर्व डॅमेज कंट्रोल केला आहे. अनेकांच्या तर्कवितर्काना पूर्णविराम देत कुठलेही मतभेद न होता एकोप्याचे दर्शन तालुका भाजपाने घडवले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here