देवळा प्रतिनिधी : पिंपळगाव (वा.) तालुका देवळा येथील, वन जमीन हक्क धारक आदिवासी वस्ती तब्बल स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतर भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रयत्नामुळे प्रकाशमान झाली. आज दि. ३० रोजी या वस्तीत विद्युतीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरही येथील आदिवासी वस्ती वीजजोडणी पासून वंचित असल्याने या भागातील अंधार नेमका कधी दूर होईल? हा अनुत्तरित प्रश्न निर्माण झाला होता. मात्र , भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्या अथक प्रयत्नांमुळे महावितरण येथील जनतेचे जीवनमान प्रकाशित होणार आहे. आज या कामाचा उदघाटन देखील करण्यात आले. वस्तीवर विद्युत वहिनी बरोबर भविष्यातील गरजा लक्षात घेता रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शाळा ,अंगणवाडी , आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आहेर यांनी सांगितले. त्याच बरोबर आपण देखील प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करावी. असे देखील आवाहन यावेळी आहेर यांनी केले.
यावेळी महंत गणेशागिरीनंद महाराज देवदारेश्वर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, माजी उपसरपंच नदीश थोरात, महावितरणचे सहाय्यक अभियंता आर. आर. खाडे, सतीश बच्छाव, विद्युत कर्मचारी सागर आहेर तसेच समाधान सोनजे, प्रमोद ठाकरे, महेंद्र पाटील, भाऊसाहेब बागुल, रवींद्र बागुल, समाधान जाधव, हनुमंत जाधव, नामदेव जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम