
देवळा प्रतिनिधी : खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अतिदुर्गम अशा कांचने गावांत आदिवासी बांधवांचा सुरू असलेल्या डोंगऱ्या देव उत्सवात कोविड लसीकरण करण्यात आलें .याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन पगार यांनी डोंगऱ्या देव उत्सवात सामील असलेल्या आदिवासी बांधवाना समुपदेशन करण्यात आले .

तालुक्यात कोविड लसीकरणला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आदिवासी बांधवांनी याकडे दुर्लक्ष केले आहे . यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासी बांधवांचे लसीकरण करून घेतले जात आहे . वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे ,डॉ. संतोष आडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दुर्गम भागातील कणकापुर उपकेंद्रातील कांचने येथे कोविड लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असून आदिवासी बांधवांचा सुरू असलेल्या डोंगऱ्या देव उत्सव कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन पगार यांनी आदिवासी बांधवाना लसीकरणासाठी समुपदेशन करून राहिलेल्या वंचित लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला .
यावेळी आरोग्य सेवक प्रदीप पाठक, आरोग्य सेविका श्रीमती भुसारे व आशा सेविका शुभांगी हेंबाडे आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम