आदर्श गाव कापशी येथे गणेशोत्सवात 100% कोरोना लसीकरनाचा निर्धार

0
20

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील आदर्शगाव कापशी विविध समाजोपयोगी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान व शितलदास महाराज गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गाव एकत्र येत एक गाव एक गणपती मोहीम राबवून एकच ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण देवळा तालुक्यात कोरोनाजन्य परिस्थितीत गर्दी न करताही गणेशोत्सव साजरा करता येतो याचे एक उत्तम उदाहरण आदर्श गाव कापशीने सर्वांसमोर ठेवले आहे.

आजरोजी कोरोनाची तिसरी लाट येनार यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सतर्क राहून कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर प्रशासनाचा भर असताना त्यात कापशी ग्रामस्थांनी मागे न राहता केलेला निर्धार व संकल्प हा निश्चितच बहुमोल योगदानाचा राहील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त करून आनंद व्यक्त केला आहे.

सर्व गाव एकजुटीने लसीकरनापासून जे वंचित राहिले आहेत त्यांची माहिती ह्या गणेशोत्सव काळात घरोघरी जाऊन व संपर्क साधून एकत्र करून एक यादी तयार करणार असून त्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडे पाठवून प्रशासनाला मदत म्हणून आपले कर्तव्य पार पाडणार आहे.

यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला असून कोरोनामुक्त गाव करणारच अशी शपथच घेतली आहे. या निर्णयाचे संपूर्ण कापशी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील सर्वांनी दिले आहे.

आज गणेशोत्सव चा पहिला दिवस यानिमित्ताने आरतीचा पहिला मान कापशी गावचे रहिवाशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जयदिप भदाणे यांना देण्यात आला.

तरी गावातील नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती द्यावी व लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले आहे.

याप्रसंगी गणेशोत्सव आयोजक गणेशभक्त विजय राजाराम भदाणे, दर्शन भदाणे, अविनाश खैर, शरद भदाणे, अंकुश भदाणे, सचिन अहिरे, कुशाल देवरे, जय भदाणे, वैभव आहेर, दिनकर भदाणे, डिगंबर भदाणे, संदिप भदाणे, हरी भदाणे, सतिश भदाणे, शंतनु भदाणे, विकास अहिरे, शरद वाघ, गणेश भदाणे, यश साबळे, आकाश साबळे, सुनिल माळी, भिला भदाणे, पप्पू वाघ, राहुल भदाणे, योगेश भदाणे सचिन भदाणे आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोविड 19 कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरनापासून वंचीत राहिलेल्या सर्व घटकांची व नागरिकांची माहिती घेऊन प्रशासनाकडे माहिती देऊन लवकरात लवकर लसीकरण उपलब्ध करून घेऊन 100 टक्के लसीकरण युक्त गाव करण्याकडे प्रयत्न करणार.
– जयदिप भदाणे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here