द पॉईंट नाऊ ब्युरो : तृतीयपंथी म्हटले की, बहुतांश लोक नाक मुरडतात. तृतीयपंथी देखील या जगाचा एक भाग आहेत हे विसरतात. मात्र लातूरमध्ये एक अतिशय कौतुकास्पद बाब समोर आली आहे. इथे तृतीयपंथीयांनी एका मुलीचे कन्यादान केले.
लातूरच्या माताजी नगर येथील कवाले कुटुंब. त्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यासमोर समस्या होती. ही माहिती शहरातील तृतीयपंथी प्रिया लातूरकर यांना समजली. आणि त्यांनी मदतीचा हात पुढे करून पुढाकार घेत लग्नासाठी आर्थिक हातभार लावला. त्यांनी कवाले कुटुंबियांची मोठी समस्या सोडवली. या कवाले कुटुंबियांच्या कन्येचे त्यांनी कन्यादान केले.
देशातील ही बहुधा पहिलीच अशी घटना असावी, ज्यात एका तृतीयपंथीयाने मुलीचे कन्यादान केले. यामुळे सर्व स्तरातून या क्रियेचे कौतुक केले जात आहे. तृतीयपंथीयांना बहुतांश लोक नकारात्मक दृष्टीने बघतात. मात्र लातूर येथे प्रिया लातूरकर या तृतीयपंथीयांनी एक वेगळाच आदर्श घालून देत, सर्वांची मने जिंकली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम